[PLUG] Please Sign The Petition

Milind Oka oak445 at gmail.com
Sat Apr 11 06:51:35 IST 2015


It is another Linux Base OS localized for 18 Indian Languages. They 
(CDAC) have improved the kernel also
according to their claim.
Any existing FOSS system can serve the purpose but common man is unable 
to understand the FOSS concept.
For him Linux and Windows (pirated) both are free so rulers are 
exploiting the situation.
That is the reason FOSS has never been adopted. The name BHARAT is 
important and
common indian can support it due to attachment to the country and the 
purpose will be served. Later on we do not mind shifting to
any FOSS system.

Here is my preface of the story in Marathi  .....(Please search 
Tamilnadu GO making BOSS mandatory)

काल परवा पर्यंत मला  भारत ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल (WWW,BossLinux.in) काहीच 
माहिती नव्हती. अचानक एका
मित्राकडून (FOSS , Free and Open Source वर चर्चा करताना) ही लिंक मिळाली. 
साईट पूर्ण पिंजून काढली. भयंकर अस्वस्थता आली.
जो भेटेल त्याला सांगत सुटलो. (बहुतेकांनी मला वेड लागले आहे असे
अनुमान काढले !) संगणक प्रांतात नोकरी /व्यवसाय करणाऱ्या कोणाला याबद्दल काहीच 
माहिती नव्हती. बाकी लोकांची बातच सोडा !

IIT-B च्या साईटवर Open Source चा पुरस्कार करणारा संदेश एकेकाळी होता. तो आठवून
साईटला भेट दिली. धक्का बसला कारण तो संदेश काढून टाकला होता. चिडून त्यांना इमेल टाकले.
पण तेही लक्ष देतील असे वाटत नाही.

याचा प्रसार करण्याची तातडीची  गरज वाटली. लोकांचा थंड प्रतिसाद बघून अधिक अस्वस्थ
झालो. काम महत्वाचे वाटले पण पाठींबा कोणाचा मिळणार नाही याची खात्री पटली.
FOSS वर काम करणाऱ्या अनेक साईट अनेक वर्षांपासून माहित होत्या. पण बहुतेक
(भारतातील) साईट दोन पाच वर्षांपासून थंड पडलेल्या. अनेक लिंक पालथ्या घालताना काही
बळ देणाऱ्या माहितीचे तुकडे
मिळाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी समजली की तामिळनाडू सरकार ने एक वर्षापासून ही
ऑपरेटिंग सिस्टीम सरकारी कार्यालयात अनिवार्य केली आहे.

भारत ऑपरेटिंग सिस्टीम मधे काही फार उणीवा आहेत असे सकृत दर्शनी वाटत नाही. १८
भाषांचा समावेश असलेली ही तगडी आणि विनामूल्य भारत ऑपरेटिंग सिस्टीम जोर केल्यास
नाकारणे कोणत्याही पक्षाला
जड जाणार आहे. भारत ऑपरेटिंग सिस्टीम तसेच तामिळनाडूचा हा उपक्रम लोकांपर्यंत पोचू नये
याची काळजी सर्व पक्ष घेत आहेत. किंबहुना अशी सुनियोजित योजना आहे असे वाटते.

काही वर्षांपूर्वी मी FOSS च्या प्रसाराला सुरवात करायची असे ठरवले होते. पण लोकांचे
संगणकाचे तुटपुंजे ज्ञान बघता तसे शक्य वाटले नाही. शिवाय IIT , TIFR या दिग्गज संस्था याचा
पाठपुरावा करत होत्या तेव्हा पाच दहा वर्षात सर्वत्र FOSS दिसेल असा विश्वास वाटला.
दुर्दैवाने असे झाले नाही. आणि Microsoft ने देशाचा पूर्ण कब्जा घेतला.

सरकारचा FOSS ला साहजिकच विरोध होता आणि Microsoft ला पाठींबा होता. Windows
आणि Linux ही दोन्ही नावे लोकांना फिरंगीच होती. त्यामुळे सामान्य लोकांचा सहभाग
याला मिळाला नाही.
लोकांना झुलवत ठेवण्या साठी C-DAC चा वापर केला गेला पण software लिहिणारा कोणीही
वाईट software ठरवून लिहू शकत नाही हे राजकारण्यांना कळलेच नाही. त्यामुळे "भारतचे"
अनेक flavours C-DAC ने काढले. राज्यकर्त्यांनी नकळत एक मोठी चूक (जनतेच्या दृष्टीने
फायद्याची ) केली आहे. ती म्हणजे  "भारत" हे नाव ऑपरेटिंग सिस्टीमला दिले आहे !

एके काळी Windows काढा आणि Linux टाका या आग्रहाला सामान्य लोकांनी फारसे महत्व
दिले नाही. पण Windows काढा आणि Bharat टाका याला मात्र चांगला प्रतिसाद मिळेल
असे वाटते.
२०० वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. मात्र फरक हा आहे की अनेक इस्ट(वेस्ट)
इंडिया कंपन्या एकाच वेळेस कार्यरत आहेत. एका कंपनीशी लढण्याची आपल्याला तयारी 
करायची  आहे.

धन्यवाद.
मिलिंद ओक

On 10-04-2015 20:44, Mayuresh wrote:
> On Thu, Apr 09, 2015 at 10:12:24PM +0530, Milind Oka wrote:
>> Please sign the petition on the following link and share it via
>> Facebook, WhatsApp and email
> Can the OP/others who know about the project, elaborate more on its goals,
> purpose etc? And which of those are not being met by any of the existing
> FOSS systems (or can't be met by just extending them).
>
> Mayuresh.
> _______________________________________________
> plug-mail mailing list
> plug-mail at plug.org.in
> http://list.plug.org.in/listinfo/plug-mail
>



More information about the plug-mail mailing list