[PLUG] A request
Milind Oka
oak445 at gmail.com
Sat Jun 4 11:33:49 IST 2016
Hi,
Mr P A Inamadar is a key person in obtaining important notification from
MHRD regarding FOSS in School Education. I have not met him but in touch
with him through telephone and email. He is president of M C E Society
(Azam Campus Pune), Azam Campus <http://mcesociety.org/>Pune
<https://en.wikipedia.org/wiki/Pune>
He has shown interest in promoting FOSS in institutions run by MES.
I stay at Mumbai. Also I do not belong to any active FOSS group. So it
is not practical for me to visit Pune frequently. So I request PLUG
members to meet him and do the needful, if they already have not done
so. Would definitely join PLUG meeting once to meet you people.
regards,
Milind
-------- Forwarded Message --------
Subject: Re: मायक्रोसॉफ्ट शिक्षणक्षेत्रातुन हद्दपार होणार ?
Date: Sat, 4 Jun 2016 04:19:22 +0530
From: P.A. Inamdar <president at azamcampus.org>
To: Milind Oka <oak444 at gmail.com>
Thanks. Let us meet. I think u should address my concerned staff. Our
ignorance is the issue asset
On 3 Jun 2016 10:05 pm, "Milind Oka" <oak444 at gmail.com
<mailto:oak444 at gmail.com>> wrote:
श्री इनामदार
नमस्कार,
मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्यांच्या विरोधात आपण सुरु केलेला लढा अजूनही सुरूच आहे.
सुमारे सव्वा वर्षांनंतर त्यात बरीच प्रगती झाली आहे.
मायक्रोसॉफ्टची सर्वात धोकादायक चाल म्हणजे शिक्षणक्षेत्रावर हल्ला. लहानपणी
शाळेकडुन व नंतर महाविद्यालयातुन मायक्रोसॉफ्टचं बाळकडु दिलं तर मुले मायक्रोसॉफ्टची
आयुष्यभर गुलाम रहातील हा अगदी साधा हिशेब. पण तो सव्वाशे कोटी भारतीयांना कधी
समजलाच नाही हे आपल्या देशाचं दुर्दैव. सुरवातीला मायक्रोसॉफ्टचा शिक्षणात समावेश
आवश्यकच होता कारण दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. पण लीनक्स व 'भारत-लीनक्स'
विकसीत झाल्यावर म्हणजे या बाबतीत 'भारत' स्वयंपुर्ण झाल्यावर मायक्रोसॉफ्टला
शिक्षणक्षेत्रातुन हाकलणे ही अगदी स्वाभाविक बाब होती. पण मायक्रोसॉफ्टने आजही
शिक्षणक्षेत्रावर जी साम-दाम-दंड याद्वारे घट्ट पकड ठेवली आहे ती देश अजुनही
पारतंत्र्यात असल्याची साक्ष देत आहे. सुरवातीचे कृत्रीम उपग्रह दुसऱ्या देशांच्या
प्रक्षेपकांद्वारे सोडणारा आपला देश PSLV यशस्वी झाल्यावर आता दुसऱ्या देशाची
मिनतवारी करतोय का ? मग मायक्रोसॉफ्टने लोकांना अशी काय भुल पाडली आहे की
सक्षम, विनामुल्य 'भारत OS' आणि देशाचा स्वाभिमान सोडुन मायक्रोसॉफ्टची कास
त्यांनी धरावी ?
दिनांक 27 मे 2016 रोजी बोर्डाकडून मला मिळालेले उत्तर तमाम भारतीयांना लाज
आणणारं आहे. गेली अनेक वर्षे आपण शैक्षणिक धोरणांची पायमल्ली करत आहात असा स्पष्ट
आरोप केल्यावर बोर्डाने बचावात्मक पवित्रा घेतला. पण त्यामुळे त्यांचे बिंग मात्र बाहेर
पडले. कातडी वाचवण्यासाठी 2014 साली काढलेले परिपत्रक थेट शाळांना न पाठवता ते
शिक्षण संक्रमण या मासिकात छापून दिले आहे व त्याची फार प्रसिद्धी होऊ नये याची
सर्वतोपरी काळजी घेतली गेली आहे.
शिक्षण स्वातंत्र्याची पहाट आणणारे हे धोरण जोशात राबवून आनंदोत्सव साजरे करायचे
सोडून शिक्षण मंडळ ते धोरण लपवण्याची धडपड करत आहे ! त्याहूनही चीड आणणारी गोष्ट
म्हणजे 'ओपन सोर्स ला प्राधान्य दयावे' अशी स्पष्ट सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून
आली असताना 'ओपन सोर्स वापरू शकता' अशी निर्जीव टीप देऊन पुन्हा मायक्रोसॉफ्टचे
हित जपण्याची केविलवाणी धडपड बोर्डाने सुरूच ठेवली आहे. या सगळ्याचा समाचार मी
wa, fb आणि इतर मार्गानी घेतो आहे. घेत राहणार आहे.
शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आता पुढील वर्षी पासून मायक्रोसॉफ्ट आणि इतर
सॉफ्टवेअर उत्पादनांवर एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही असे बोर्डाने स्पष्टपणे
कळवले आहे ! ही चांगली बातमी सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यलये, विद्यार्थी व
पालकांपर्यंत पोहोचायला हवी. म्हणजे शिक्षण क्षेत्रावर याचा निश्चित चांगला परिणाम
होईल. यामुळे IT शिक्षणाची फी किती कमी होईल याचाही अभ्यास करायला हवा. पण
त्याहूनही मानसिक गुलामगिरीतून सुटका सगळ्यात जास्त महत्वाची.
वरिष्ठ महाविद्यालयाला संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाला मात्र याचा फारसा
फायदा होणार नाही कारण डिग्री वर्गासाठी साॅफ्टवेअरची खरेदी कारावीच लागेल.
त्यामुळे आता UGC अथवा MHRD कडुन विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी अशीच आॅर्डर
मिळवायला हवी.
आपण MHRD कडून प्रयतपूर्वक मिळवलेले नोटिफिकेशन अगदी अमूल्य असेच आहे. आपली दूरदृष्टी
व शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव यामुळेच हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता
निर्माण झाली आहे.
आपला मी शतशः ऋणी आहे. आपले आशीर्वाद, मार्गदर्शन आणि सहकार्य यापुढेही असेच
मिळत राहील याची खात्री आहे.
मिलिंद ओक.
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://list.plug.org.in/pipermail/plug-mail/attachments/20160604/e26de44e/attachment.html>
More information about the plug-mail
mailing list